दिव्य मराठी ॲपने सुरू केलेल्या 'लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा' या टॉक शोमध्ये शहरातील नागरिक आपल्या समस्या उघडपणे मांडताना दिसून येत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांशी संवाद साधल्यानंतर अनेक गोष्टी उघडकीस आल्या. प्रभागातील
.
प्रभाग १७ हा खडकेश्वर पासून सुरू होऊन सिल्लेखान्याच्या उत्तर बाजूला संपतो. प्रभागात फिरल्यानंतर अनेक ठिकाणी मोकळ्या जागेचा गैरवापर होताना नजरेस आले. येथील नागरिकांशी विचारणा केल्यावर त्यांनी सांगितले की, 'आमच्याकडे ज्या जागा आहेत, त्या मोकळ्या जागेवर रात्री सगळी टुकार मुले येऊन बसतात. ते दारू, सिगारेट आणि काहीजण तर नशा देखील करतात. त्याचा परिणाम असा होतो की आम्हाला रात्री तिथून येताना भीती वाटायला लागते. नशेत असल्यामुळे ते काय करतील याचा नेम नसतो. तिथे लाइट सुद्धा नसतात. त्यामुळे या समस्येवरती काहीतरी उपाययोजना केली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे.
'आम्ही आमचे घरं पडायला तयार आहोत'
प्रभागात राहणाऱ्या महिलांशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, 'आमच्याकडे रस्ता एवढा छोटा आहे की, आम्हाला आमची टू -व्हीलर सुद्धा लावता येत नाही. जर गाडी लावली तर चालायला रस्ता सुद्धा पुरत नाही. आमचा स्लम एरिया येतो. त्यामुळे इकडे मोकळी जागा नाही. लहान मुलांना खेळण्यासाठी सोडायचं तर कुठे सोडावं? अतिक्रमणात येत असतील तर एकवेळेस आमची घरं पाडा, पण आम्हाला रस्ता करून द्या.' या भागात नागरिकांनी आपली घरे अगदी जवळजवळ बांधल्यामुळे इथेच जागा उरत नाही. त्यामुळे त्याचा त्रास आता सहन करावा लागत आहे.
चेंबरची जुनीच लाइन
भागातील रहिवासी असलेल्या 'पूजा जिनवाल' म्हणाल्या, 'आमच्याकडे कीर्ती शिंदे यांनी अनेक सुविधा केल्या आहेत, पण आमच्याकडे चेंबर आहेत. ते उखडून निघाले आहेत. त्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. पावसाळ्यात त्याचा एवढा त्रास होतो की, त्याचच पाणी पिण्याच्या पाण्यात मिक्स होऊन येत. आमच्या गल्ल्लीच्या शेवटी रस्ता खराब झाला असून तिथे खड्डा तयार झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात इथे पाणी साचतं. तिथेच काहीजण कचरा आणून टाकतात त्यामुळे घाण पसरते. त्यामुळे येणाऱ्या नगरसेवकांकडून आम्हाला हीच अपेक्षा आहे की त्यांनी आमच्या समस्या सोडवाव्यात.'
जो भाग विकसित करेन मतदान त्यांनाच
प्रभागात फिरताना एका ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की, 'आमच्या प्रभागाचा जे विकास करतीन त्यांनाच आम्ही आमचा प्रमुख बनवू. एका सामान्य नागरिकाला नगरसेवकांकडून काय अत्यंत सध्या अपेक्षा असतात की, त्यांनी प्रभागात फिरून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढणे. नागरिकांना न्याय देणे. त्यामुळे जे विकास करतील त्यांनाच मतदान देऊ.'
याच भागात राहणाऱ्या जयश्री नेमे म्हणतात की, 'आमच्याकडे ड्रेनेज लाइन जुन्या आहेत. त्यामुळे त्यांचा त्रास होतो. परंतु कीर्ती शिंदे यांनी पदावर नसताना सुद्धा आमच्या भागात येऊन अनेक काम केली आहेत. आता त्यांनी या ड्रेनेज लाइन नीट करण्याचे आश्वासन दिल आहे. तसेच आमच्याकडे रस्ता छोटा झाला आहे. समर्थ नगरहून येणार जो पूल आहे. त्याच सगळं ट्राफिक आमच्याकडे येतेय. त्यामुळे रस्ता आता पुरत नाही.'
स्पीड ब्रेकरची आवशक्यता
प्रभातील पुष्पकनगरी भागात गेले असता येथील ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की, 'आमच्या भागात डॉ. पारगावकर पासून जो रस्ता आमच्या सोसायटीकडे येतो. हा रस्ता गुळगुळीत आहे. त्यामुळे रात्री इथून काहीजण खूप स्पीडने गाडी चालवतात. आमच्या इथे एकही स्पीड ब्रेकर नाही. समोरच नाना-नानी पार्क आहे. इथे आमचे लहान मुलं खेळतात. गाड्या भरधाव वेगाने येतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता खूप मोठी आहे. काही दिवसांपूर्वीच याच कारणामुळे इथे दोन अपघात झाले होते. म्हणून आम्हाला इथे स्पीड ब्रेकर करून द्यावं हीच अपेक्षा आहे.'
प्रभाग १७ मधील काही भागात पाणी पुरवठा हा ५ दिवसाला होतो तर काही भागात १५ -२० दिवसाला होतो. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त आहेत. तसेच भागामध्ये वाढती नशेखोरी आणि गुन्हेगारीने लोकांचे जगणे मुश्किल केले आहे. नागरिकांनी सांगितले की, 'भोईगल्लीतून जाणारा जो पूल आहे तिथे अतिशय घाण पसरली आहे. लोक तिथेच कचरा आणून टाकतात...' याच भागात नशा करणारे येतात. त्यामुळे येथील महिला रात्र झाली की घरातून बाहेर पडायला सुद्धा घाबरतात. रस्त्यावर असलेले लाइट सुद्धा ही लोक फोडून टाकतात. गाड्या अडवून आमच्या गाड्या फोडतात. त्यामुळे महिलाच नाही तर पुरुष देखील या भागात फिरताना भीती व्यक्त करतात.
अशी आहे प्रभागाची रचना
प्रभाग क्रमांक १७ मध्ये खडकेश्वर, भोईवाडा, मिल कॉर्नर, सरस्वती भुवन कॉलनी, जय हिंद कॉलनी, नागेश्वरवाडी, सुंदर नगर, नेहरू पॅलेस, समर्थ नगर, पुष्पनगरी, श्रीरामनगर, म्हाडा कॉलनी, भाग्यनगर, चिंतामणी कॉलनी, कोटला कॉलनी, शिवाजी कॉलनी, शांतानगर कॉलनी, पोलीस वसाहती, एमआयडीसी कॉलनी. अभय पुत्र कॉलनी, देवगिरी कॉलनी, सिल्लेखाना उत्तर बाजुचा समावेश होतो. भागातील लोकांची संख्या जर बघितली तर ती 38084 एवढी आहे.
(0)تعليقات