Rahul Dravid : राहुल द्रविड आता विजय सेल्सचा नवा चेहरा; ब्रँड अँबेसेडरपदी निवड

Rahul Dravid : राहुल द्रविड आता विजय सेल्सचा नवा चेहरा; ब्रँड अँबेसेडरपदी निवड
View on original source
Category: Business
Share
Archive
Like
September 8, 2026 07:57 PM मुंबई : भारतातील आघाडीची ओम्नी-चॅनल इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेन विजय सेल्सने क्रिकेटपटू राहुल द्रविड यांची ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. या सहयोगाच्या माध्यमातून तंत्रज्ञान क्षेत्रातील विश्वासार्ह नाव आणि क्रिकेटविश्वातील विश्वास, सातत्य व प्रामाणिकपणाचे प्रतीक असलेल्या राहुल द्रविड यांना एकत्र आणण्यात आले आहे. (Rahul Dravid) पाच दशकांहून अधिक काळ विजय सेल्सने भारतीय कुटुंबांना त्यांच्या इलेक्ट्रॉनिक्स खरेदीच्या प्रवासात साथ दिली आहे. पहिला टेलिव्हिजन किंवा रेफ्रिजरेटर खरेदी करण्यापासून ते काळानुसार होणाऱ्या प्रत्येक तंत्रज्ञानाच्या अपग्रेडपर्यंत ग्राहकांना योग्य मार्गदर्शन देण्याची परंपरा कंपनीने जपली आहे. विश्वास, विश्वासार्हता आणि प्रामाणिक सल्ला या मूल्यांवर आधारित कंपनीचे 'डिलिव्हरिंग अपनापन' हे ब्रँड वचन आहे. राहुल द्रविड यांची विश्वासार्ह आणि संयमी प्रतिमा या मूल्यांशी सुसंगत असल्याने त्यांची ब्रँड अँबेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. या सहयोगाबाबत बोलताना विजय सेल्सचे संचालक निलेश गुप्ता म्हणाले, 'विजय सेल्सची वाटचाल केवळ व्यवहारांवर नव्हे, तर ग्राहकांसोबतच्या नात्यांवर आधारित आहे. ग्राहकांच्या गरजा समजून घेणे, त्यांना योग्य सल्ला देणे आणि खरेदीनंतरही त्यांच्या सोबत राहणे, या विश्वासाच्या भावनेने आम्हाला पाच दशकांहून अधिक काळ पुढे नेले आहे. राहुल द्रविड या मूल्यांचे उत्तम प्रतिनिधित्व करतात आणि त्यांच्याशी देशभरातील ग्राहक जोडले जातात. त्यामुळे विजय सेल्सच्या पुढील वाटचालीत त्यांना ब्रँडचा चेहरा बनवताना आम्हाला आनंद होत आहे.' (Rahul Dravid) विजय सेल्ससोबतच्या सहयोगाबद्दल राहुल द्रविड म्हणाले, 'काही ब्रँड्स केवळ ते काय विकतात यामुळे लोकांच्या आयुष्याचा भाग बनत नाहीत, तर त्यांनी निर्माण केलेल्या विश्वासामुळे ते नातं टिकतं. विजय सेल्सने अनेक दशकांपासून भारतीय कुटुंबांसोबत हे नातं जपलं आहे. त्यांच्या 'डिलिव्हरिंग अपनापन' या संकल्पनेतील साधेपणा आणि आपुलकीशी मला विशेष जोडलेपण जाणवतं. विजय सेल्ससोबतच्या या प्रवासाचा भाग बनताना मला आनंद होत आहे.' विजय सेल्स आपल्या ओम्नी-चॅनल व्यवसायाचा विस्तार करत असताना हा सहयोग करण्यात आला आहे. कंपनीच्या स्टोअर्समधील सेवा आणि तज्ज्ञता यांची सांगड ऑनलाइन खरेदीच्या सुविधेशी घालण्यात आली आहे. आगामी काळात टेलिव्हिजन, डिजिटल, सोशल मीडिया, इन-स्टोअर तसेच ग्राहकांशी संवाद साधणाऱ्या विविध माध्यमांवरील मोहिमांमध्ये राहुल द्रविड प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. वर्षभरातील विविध उत्पादन श्रेणी आणि सणासुदीच्या मोहिमांमध्येही ते ब्रँडचे प्रतिनिधित्व करतील.(Rahul Dravid) तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या गरजा काळानुसार बदलत असल्या, तरी विश्वास, नातेसंबंध आणि ग्राहकांप्रती असलेली आपुलकी ही विजय सेल्सच्या प्रवासातील कायमची मूल्ये आहेत. राहुल द्रविड यांच्यासोबतचा हा सहयोग याच मूल्यांना आणखी बळकटी देणारा ठरणार आहे.(Rahul Dravid)

(0)Comments

 

A note on cookies

Newshunt uses essential cookies to keep you signed in and to remember your language and country, so the site works the way you expect. With your permission, we'd also like to use analytics cookies to understand how people use Newshunt and improve it over time.

Accepting only affects analytics. To learn more, view our Privacy Policy or Terms & Conditions.