Women's Asia Cup: पाकिस्तानी कर्णधारानंतर आता या विकेटकीपर खेळाडूवर कारवाई! आयसीसीने ठोठावला मोठा दंड

Women's Asia Cup: पाकिस्तानी कर्णधारानंतर आता या विकेटकीपर खेळाडूवर कारवाई! आयसीसीने ठोठावला मोठा दंड
View on original source
Category: Sports
Share
Archive
Like
आशियाई क्रिकेट परिषद (Asian Cricket Council) आयोजित महिला आशिया कप 2026 स्पर्धेत (Women's Asia Cup 2026) पाकिस्तानच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. कर्णधार फातिमा सनानंतर आता संघाची यष्टिरक्षक-फलंदाज गुल फिरोजावरही आयसीसीने (International cricket Council) कारवाई केली आहे. हाँगकाँगविरुद्धच्या साखळी सामन्यादरम्यान आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुलवर तिच्या सामन्याच्या मानधनाच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. ही घटना 7 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या पाकिस्तान आणि हाँगकाँगच्या सामन्यात पाकिस्तानच्या डावातील पाचव्या षटकात घडली. गुल फिरोजाला पायचीत (LBW) बाद देण्यात आले होते. या निर्णयाशी असहमती दर्शवत तिने आपल्या बॅटकडे इशारा केला. चेंडू बॅटला लागला होता, असे सांगण्याचा तिचा प्रयत्न होता. आयसीसीने गुलला खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी असलेल्या आचारसंहितेतील कलम 2.8 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले. हे कलम आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान अंपायरच्या निर्णयावर असहमती दर्शवण्याशी संबंधित आहे. दंडासोबतच गुलच्या शिस्तभंगाच्या नोंदीत एक डिमेरिट पॉइंटही जोडण्यात आला आहे. गेल्या 24 महिन्यांतील हे तिचे दुसरे उल्लंघन आहे. त्यामुळे या कालावधीत तिच्या डिमेरिट पॉइंटची संख्या आता दोन झाली आहे. यापूर्वी 23 जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील साखळी सामन्यातील एका अन्य उल्लंघनासाठी तिला एक डिमेरिट पॉइंट मिळाला होता. गुल फिरोजाने आपली चूक मान्य केली. तसेच एमिरेट्स ICC इंटरनॅशनल पॅनेल ऑफ मॅच रेफरीच्या सदस्या सुप्रिया राणी दास यांनी सुचवलेली शिक्षा देखील तिने स्वीकारली. त्यामुळे या प्रकरणात औपचारिक सुनावणी घेण्याची गरज पडली नाही. सामन्यातील मैदानी पंच रबाब अहसान आणि रोकैया सुलताना, तिसऱ्या पंच शिवानी मिश्रा तसेच चौथ्या पंच शातिरा जाकिर यांनी गुलविरुद्ध आरोप केले होते. आयसीसीच्या आचारसंहितेतील लेव्हल-1 उल्लंघनासाठी अधिकृत ताकीद देण्यापासून ते खेळाडूच्या सामन्याच्या मानधनाच्या जास्तीत जास्त 50 टक्क्यांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. याशिवाय खेळाडूच्या खात्यात एक किंवा दोन डिमेरिट पॉइंटही जोडले जाऊ शकतात. गुल फिरोजावर या प्रकरणात तिच्या सामन्याच्या मानधनाच्या 10 टक्के दंड आणि एक डिमेरिट पॉइंट अशी शिक्षा करण्यात आली आहे.

(0)Comments

 

A note on cookies

Newshunt uses essential cookies to keep you signed in and to remember your language and country, so the site works the way you expect. With your permission, we'd also like to use analytics cookies to understand how people use Newshunt and improve it over time.

Accepting only affects analytics. To learn more, view our Privacy Policy or Terms & Conditions.