Mumbai Ganesh Murti Collapse : गणेशोत्सवाला पुन्हा एकदा गालबोट! कुर्ल्यात स्पीड ब्रेकरवर तोल गेला अन् गणेशमूर्ती रस्त्यावर कोसळली

Mumbai Ganesh Murti Collapse : गणेशोत्सवाला पुन्हा एकदा गालबोट! कुर्ल्यात स्पीड ब्रेकरवर तोल गेला अन् गणेशमूर्ती रस्त्यावर कोसळली
View on original source
Category: Blend
Share
Archive
Like
जाहिरात सारांश AI Generated Image विस्तार कुर्ल्यात स्पीड ब्रेकरवर वाहनाला धक्का बसल्याने गणेशमूर्ती रस्त्यावर कोसळली. मूर्ती पडताच कार्यकर्ते आणि नागरिकांची एकच धावपळ उडाली. पोलिसांच्या तत्परतेमुळे परिस्थिती आटोक्यात; सुदैवाने जीवितहानी नाही. Mumbai Ganesh murti collapse : मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच कुर्ला पश्चिमेतील शीतल तलाव परिसरात मंगळवारी (दि. ८) एक धक्कादायक घटना घडली. नवपाडा भागातील एका गणेश मंडळाची मूर्ती वाहनातून वाजतगाजत धारावीच्या दिशेने नेली जात होती. सगळं सुरळीत सुरू असतानाच शीतल तलावाजवळ वाहन स्पीड ब्रेकरवर आलं आणि अचानक जोरदार धक्का बसला. धक्क्यामुळे वाहनावरील गणेशमूर्तीचा तोल गेला आणि काही क्षणांतच मूर्ती थेट रस्त्यावर कोसळली. अचानक समोर घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांची एकच धावपळ उडाली. काही काळ परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती हातात घेत नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. त्यामुळे परिस्थिती बिघडण्यापूर्वीच सगळं आवरता आलं. जाहिरात जाहिरात यानंतर पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने मंडळाच्या कार्यकर्त्यांशी समन्वय साधला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत, याची काळजी घेत संबंधित गणेशमूर्तीचे जवळच असलेल्या शीतल तलावात शांततेत विसर्जन करण्यात आले. Mumbai Goa Highway Traffic : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार असाल तर महत्त्वाची बातमी! मुंबई-गोवा महामार्गावर 'या' वाहनांना बंदी या संपूर्ण प्रकारात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिसरातील वातावरणही काही वेळात पूर्वपदावर आलं. भुलेश्वरमधील घटनेनेही उडाली होती खळबळ दरम्यान, मुंबई त नुकतीच काही दिवसांपूर्वी, गणेशोत्सवाच्या काळात गणेशमूर्ती कोसळण्याची गंभीर घटना घडली होती. भुलेश्वर परिसरात 'भुलेश्वरचा राजा'ची तब्बल २२ फूट उंच मूर्ती मंडपापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर असताना अचानक कोसळली होती. या दुर्घटनेत मंडळाच्या अध्यक्षांसह दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे कुर्ल्यातील आजच्या घटनेत जीवितहानी टळल्याने मोठा धोका टळल्याचं दिसून आलं. असं असतानाच आता पुन्हा एकदा गणेशमूर्तींच्या उंचीबाबत आणि मुंबईच्या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत चर्चा सुरु झाली आहे. आता गणेश मंडळे आणि प्रशासन यवर काय तोडगा काढणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. Mumbai News : डीजे, लेझरच्या झगमगाटामुळे आरोग्य धोक्यात! श्रवणशक्ती कमी होण्याची आणि दृष्टी जाण्याचीही भीती; आयएमएचा गंभीर इशारा Published On: Sep 08, 2026 | 10:13 PM

(0)Comments

 

A note on cookies

Newshunt uses essential cookies to keep you signed in and to remember your language and country, so the site works the way you expect. With your permission, we'd also like to use analytics cookies to understand how people use Newshunt and improve it over time.

Accepting only affects analytics. To learn more, view our Privacy Policy or Terms & Conditions.