प्रतिनिधी, पिंपरीःबारामती तालुका पोलीस स्टेशनमधील पोलीस हवालदार महेश अंकुश उगले (वय ३५, रा. फ्लॅट नं.४,विमलनाथ अपार्टमेंट,सुतार चाळ,विजयनगर,बारामती,जि.पुणे)याला ५ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता.८) रंगेहात पकडले.त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.एका झुंबा डान्स क्लासविरुद्ध आलेल्या तक्रार अर्जावर कारवाई न करण्यासाठी उगलेने तब्बल सात लाख रुपये लाच मागितली.त्यातील दोन लाख…
प्रतिनिधी,
पिंपरीःबारामती तालुका पोलीस स्टेशनमधील पोलीस हवालदार महेश अंकुश उगले (वय ३५, रा. फ्लॅट नं.४,विमलनाथ अपार्टमेंट,सुतार चाळ,विजयनगर,बारामती,जि.पुणे)याला ५ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता.८) रंगेहात पकडले.त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.एका झुंबा डान्स क्लासविरुद्ध आलेल्या तक्रार अर्जावर कारवाई न करण्यासाठी उगलेने तब्बल सात लाख रुपये लाच मागितली.त्यातील दोन लाख अगोदरच घेतले.पाच लाख घेताना तो पकडला गेला.
ही कारवाई केलेल्या एसीबी च्या पुणे परिक्षेत्र युनीट ने दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार आणि त्यांची पत्नी बारामती परिसरात झुम्बा डान्स क्लास आणि जिम चालवतात. त्यांच्या झुंबा क्लास मुळे त्रस्त रहिवाशांनी त्यांच्याविरुद्ध बारामती तालुका पोलिस ठाण्यात तक्रार केली होती.त्यावर कारवाई न करण्यासाठी हवालदार उगलेने सात लाख लाच मागितली.त्यातील दोन लाख घेतलेही.बाकीचे ५ लाख घेताना त्याला माळेगाव रोडवरील पीडीसीसी बॅन्क शाखेजवळ पकडण्यात आले.एसीबी चेपोलिस उपअधिक्षक सतीश वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष पाटील,ह
वालदार प्रवीण तावरे,कॉन्स्टेबल आश्विन कुमकर,चंद्रकांत कदम यांनी हा ट्रॅप केला.विशेष म्हणजे २४ तासांत ही जलद कारवाई त्यांनी केली.काल याबाबत तक्रार आली होती.तिची पडताळणी करून आज ही कारवाई केली.उगलेविरुद्ध तो कर्तव्यावर असलेल्या बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरिकांना आवाहन
कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने कामासाठी लाचेची मागणी केल्यास त्वरित खालील क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन एसीबी च्या वतीने करण्यात आले आहे.
ACB टोल फ्री क्रमांक: १०६४ / ९४०३७८१०६४पुणे कार्यालय फोन: (०२०) २६१३२८०२
ई-मेल: [email protected] / [email protected]
(0)Comments