छत्रपती संभाजीनगर :
मराठवाड्यातून पहिल्यांदाच नांदेडहून कोकणसाठी विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नांदेड-रत्नागिरी/सावंतवाडी ही विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहे. ही विशेष रेल्वे परभणी, परळी, लातूर रोड मार्गे पुणे, सावंतवाडीकडे जाणार आहे. ही विशेष रेल्वे घोषित झाल्यामुळे मराठवाड्यात कोकण भागाशी संबंध असलेल्या प्रवाशांना लाभ मिळणार आहे. याशिवाय कोकण दर्शन करण्यासाठी जाण्याच्या इच्छुकांना या रेल्वेतून कोकणचे सौंदर्य पाहण्याचा लाभ मिळणार आहे.
गौरी गणपतीसाठी कोकण भागाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असते. मराठवाड्यात कोकण भागातील अनेक नागरिक, विद्यार्थी आहेत. या नागरिकांसाठी नांदेड ते सावंतवाडी दरम्यान विशेष रेल्वे चालविण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाकडून करण्यात आली.
या प्रवासी संघटनेकडून सिकंदराबाद, पुणे, मुंबई आणि कोकण विभागातील अधिकाऱ्यांना भेटून विशेष रेल्वे चालविण्याबाबत मागणी करण्यात आली. मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या मागणीला मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ, कोकण रेल्वे विकास समिती यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, धाराशिवचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर, लातूरचे खासदार शिवाजीराव कल्गे, नांदेडचे खासदार गोपछडे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव तसेच मध्य आणि दक्षिण-मध्य रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहून विशेष रेल्वे सुरू करण्याची एकमुखी मागणी केली.
Amruta Fadnavis : दहीहंडीत स्त्रियांना वेडं-वाकडं नाचवाल तर ते योग्य नाही, अमृता फडणवीस यांची रोखठोक भूमिका
मराठवाड्यातील नागरिकांची व लोकप्रतिनिधींची मागणी तसेच प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड–सावंतवाडी रोड–नांदेड विशेष रेल्वेगाडी क्रमांक ०७६५९/ ०७६६० चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रेल्वेच्या दोन्ही दिशेने दोन फेऱ्या होणार आहे.
अशी धावणार विशेष रेल्वे
रेल्वे क्रमांक ०७६५९ ही नांदेड-सावंतवाडी ही विशेष रेल्वे नांदेड येथून १२ आणि १४ सप्टेंबर (शनिवार आणि मंगळवार) या दोन्ही दिवशी रात्री ८ वाजता निघणार आहे. ही रेल्वे दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० ला सावंतवाडीरोड स्टेशनवर पोहोचणार आहे.
Ganeshotsav Toll Free : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! राज्य सरकारकडून टोलमाफीची घोषणा, स्वतंत्र पासची व्यवस्था
परतीत रेल्वे क्रमांक ०७६६० ही सावंतवाडी रोड - नांदेड विशेष रेल्वे सावंतवाडी रोड येथून १४ आणि १७ सप्टेंबर रोजी (सोमवारी आणि गुरुवारी) सकाळी ७.३० वाजता सुटणार आहे. ही रेल्वे दुसऱ्या दिवशी नांदेड येथे सकाळी ११.३० वाजता पोहोचणार आहे. या रेल्वेत एकूण २४ कोचेस असणार आहे. यात वातानुकूलित द्वितीय श्रेणी, वातानुकूलित तृतीय श्रेणी, स्लीपर क्लास, सामान्य द्वितीय श्रेणी आणि एस. एल. आर. असे कोचेस देण्यात आले आहे.
Gautami Patil : गौतमी पाटील हिच्या अडचणी वाढवणारी मोठी बातमी, भाजप नगरसेविकेची पोलीस ठाण्यात तक्रार
या शहरातून जाणार विशेष रेल्वे
ही विशेष रेल्वेगाडी मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक महत्त्वाच्या शहरांना व पर्यटनस्थळांना जोडणार आहे. ही रेल्वे पूर्णा जं., परभणी जं., परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, येडशी, बार्शी टाउन, कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ येथे थांबणार आहे. या रेल्वेचा लाभ मराठवाड्यातील प्रवाशांना रत्नागिरी, चिपळूण, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी यांसह कोकणातील विविध भागात जाण्यासाठी थेट रेल्वेसेवेचा लाभ मिळणार आहे.
(0)Comments