Aadhaar Card: आधारकार्डवरून नाव, पत्ता आणि नंबर गायब होणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Aadhaar Card: आधारकार्डवरून नाव, पत्ता आणि नंबर गायब होणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?
View on original source
Category: Politics
Share
Archive
Like
फक्त फोटो आणि QR कोड असलेलं नवीन आधार कार्ड येणार असल्याचा दावा खोटा ३ मे २०२६ रोजी PIBने या व्हायरल दाव्यावर अधिकृत स्पष्टीकरण दिलं नाव, पत्ता आणि आधार क्रमांक हटवून नवीन कार्ड आणण्याची कोणतीही योजना नसल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. आधार कार्डबाबत एक दावा सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. त्यात असा दावा केला जातोय की, आधार कार्डचे एक नवीन डिझाईन लवकरच जारी केलं जाईल. ज्यामध्ये नाव, पत्ता आणि आधार क्रमांक काढून टाकला जाईल आणि त्याऐवजी फक्त फोटो आणि क्यूआर कोड असेल. असा दावा करण्यात आलाय...पण, खरंच पुन्हा आता आधारकार्ड बदलून घ्यावं लागणार आहे का? असा सवाल उपस्थित होतोय. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात. हा दावा केल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली.कारण, सगळ्यांकडेच आता आधारकार्ड आहे. त्यामुळे जर बदल होणार असतील तर सगळ्यांनाचआधारकार्डपुन्हा नवीन करून घ्यावं लागेल.आधारकार्डवर 12 अंकी नंबर असतो. त्यावरून आपली सर्व माहिती उपलब्ध होते.सरकारी कागदपत्रांसाठी आपण आधारकार्ड हे पुरावा म्हणून देतो.त्यामुळे याची माहिती आमच्या टीमने सरकारकडून मागवली. यावेळी केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलंय. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात. आधार कार्डडिझाइनमध्ये कोणताही बदल होणार नाही नाव, पत्ता, आधार क्रमांक काढून टाकला जाणार नाही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं सरकारचं आवाहन तुमच्या आधार कार्डमधील कोणत्याही बदलांविषयीची माहिती केवळ अधिकृत वेबसाइटवरूनच घ्या. खोटे दावे आणि अफवांकडे दुर्लक्ष करा. कोणतेही व्हायरल मेसेज पडताळणीशिवाय शेअर करू नका. कोणत्याही माहितीबद्दल शंका असल्यास, UIDAI च्या अधिकृत वेबसाइट किंवा सोशल मीडिया हँडलचा संदर्भ घ्या. आमच्या पडताळणीत आधारकार्डचं डिझाईन बदलणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठीक्लिक करा. ReadMarathi newsand watch Live TV.Breaking newsfromMaharashtra, India, Pune,Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. GetLive Marathi newson Mobile. Download the Saam Tv app forAndroidandIOS.

(0)Comments

 

A note on cookies

Newshunt uses essential cookies to keep you signed in and to remember your language and country, so the site works the way you expect. With your permission, we'd also like to use analytics cookies to understand how people use Newshunt and improve it over time.

Accepting only affects analytics. To learn more, view our Privacy Policy or Terms & Conditions.