व्वा, याला म्हणतात नशीब! जेलमधून सुटला, फुटबॉलर बनला; आता थेट देशाचा ‘राजा' होणार, एका रात्रीत खेळाडूचं जीवन बदललं

व्वा, याला म्हणतात नशीब! जेलमधून सुटला, फुटबॉलर बनला; आता थेट देशाचा ‘राजा' होणार, एका रात्रीत खेळाडूचं जीवन बदललं
View on original source
Category: Sports
Share
Archive
Like
George Desmond Footballer King News : लंडनमध्ये फुटबॉल खेळणाऱ्या जॉर्ज डेसमंड कामुरासीची गोष्ट एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. नवव्या स्तरावरील फुटबॉल क्लब एसई डॉन्सचा गोलकीपर आणि कर्णधार असलेल्या जॉर्जची टोरो राज्याचा पुढचा ओमुकामा म्हणजेच राजा म्हणून निवड करण्यात आली आहे. एक फुटबॉलर आता राजा बनणार आहे. एका अगदी लहान क्लबकडून खेळणारा जॉर्ज डेसमंड हा आता टोरो जमातीचा राजा बनणार आहे. टोरो राज्याच्या राज्याधिकार समितीने जॉर्जला पुढचा ओमुकामा म्हणजेच राजा बनवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 18 पैकी 15 सदस्यांनी जॉर्जला कामुरासीच्या बाजूने मतदान केलं आहे. दरम्यान जॉर्ज हा लंडनमधील एका नॉन फुटबॉल क्लबचा गोलकीपर आहे. तो बिग जी या नावानेही ओळखला जातो. तसेच तो साऊथ ईस्ट लंडन क्लब एसई डॉन्सचा कर्णधारही आहे. हा क्लब देशांतर्गत फुटबॉलच्या क्रमवारीत नवव्या ठिकाणी पोहोचला आहे. दरम्यान, दुसरीकडे डेसमंड कामुरासी हा दिवंगत राजा ओयो न्यिम्बा काबाम्बा इगरु रुकुडी यांचा चुलत भाऊ आहे. त्याचे आजोबाही जॉर्ज रुकुडीही राजे होते आहेत. परंतु आता कामुरासी यांना युगांडाला परत यायचे नाही किंवा राजा व्हायचं नाही त्याला आपल्या पत्नी आणि मुलांसोबत लंडनमध्येच राहायचे आहे, अशीही माहिती समोर आली आहे. त्यामुळेही ही संधी जॉर्जकडे गेल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, कामुरासीच्या आयुष्याची गोष्ट एखाद्या चित्रपटापेक्षा काही कमी नाही. त्याने एका मुलाखतीमध्ये सगळ्या प्रवासाबद्दल मनमोकळा संवाद साधला होता. त्याने सांगितलं की मी वयाच्या 14 व्या वर्षी प्रचंड वाईट लोकांच्या संपर्कात आलो होतो. आई सोडून गेल्यानंतर खूप बदल झाला, ज्यामुळे तुरुंगवासही भोगावा लागला. आपण खूप चुकीचं वागत असल्याची जाणीव त्याला तुरुंगातच झाली. जेव्हा तो आपल्या तुरुंगातून बाहे आला, तेव्हा त्याने स्वतःला स्वतःला फुटबॉलमध्ये झोकून दिले. 6 फूट 9 इंच उंच असलेल्या या खेळाडूची निवड नायकी अकादमीमध्ये झाली. या अकादमीमध्ये त्याला पेप गार्डिओला यांच्या मार्गदर्शनासाठी बार्सिलोनासाठी खेळण्याची संधी मिळाली. आता याच खेळाडूला त्यांचा राजा म्हणून निवडण्यात आले आहे, पण कामुरासी ही ऑफर स्वीकारतो की नाही हे अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे आता पुढे काय होणार, जॉर्ज राजा बनणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

(0)Comments

 

A note on cookies

Newshunt uses essential cookies to keep you signed in and to remember your language and country, so the site works the way you expect. With your permission, we'd also like to use analytics cookies to understand how people use Newshunt and improve it over time.

Accepting only affects analytics. To learn more, view our Privacy Policy or Terms & Conditions.