सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मॉर्फ करून ते साताऱ्यातील एका नृत्य कार्यक्रमाशी जोडल्याचा आरोप झाल्याने मंगळवारी साताऱ्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले. संबंधित छाय
संबंधित यूट्यूब चॅनेलवरून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे छायाचित्र कथितरीत्या संपादित करून समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमधील छायाचित्रे एकत्र करून त्यांना चुकीचा संदर्भ देण्यात आला असून, हा प्रकार राजकीय बदनामीच्या उद्देशाने करण्यात आल्याचा आरोप समर्थकांनी केला आहे. त्यामुळे संबंधित पोस्टची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या राजे समर्थकांनी पोलिस ठाण्यात जोरदार भूमिका मांडली. एआय किंवा फोटो एडिटिंग तंत्रज्ञानाचा गैरवापर करून एखाद्या व्यक्तीचे छायाचित्र चुकीच्या संदर्भात प्रसारित करणे गंभीर बाब असून, समाजमाध्यमांवर अशा प्रकारे बदनामी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.
भाजपचे गटनेते अविनाश कदम यांनी संबंधित प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील स्थान, छत्रपती घराण्याचा वारसा तसेच विकासकामांबाबतची त्यांची भूमिका सर्वश्रुत आहे. अशा व्यक्तीचे छायाचित्र चुकीच्या पद्धतीने प्रसारित करून बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत धडा मिळाला पाहिजे, अशी भूमिका कदम यांनी मांडली. दरम्यान, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली असून, संबंधित पोस्ट, छायाचित्रे आणि त्यामागील परिस्थितीची चौकशी सुरू केली आहे. एआयच्या माध्यमातून छायाचित्रात नेमका कोणता फेरफार करण्यात आला, पोस्ट कोणी तयार केली आणि ती समाजमाध्यमांवर कोणी प्रसारित केली, याचा तपास झाल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. दरम्यान, चुकीच्या अथवा मॉर्फ केलेल्या छायाचित्रांना पुढे प्रसारित न करता संबंधित समाजमाध्यम खात्यांना 'रिपोर्ट' आणि 'ब्लॉक' करण्याचे आवाहन राजे समर्थकांनी केले आहे.
या सोशल मीडिया अकाउंट्सवर गुन्हा दाखल:
तक्रारदार अमरासिंह मोकाशी यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात खालील सोशल मीडिया हँडल्स आणि खातेदारांवर भारतीय न्याय संहिता (BNS) 353 (2), 356(2), 3(5) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) 67 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे:
Pratik Thorat - देशभक्त Gen Z (फेसबुक अकाउंट/पेज) Sonalie Deshmukh (फेसबुक प्रोफाइल) Hari Shinde (फेसबुक प्रोफाइल) Mandesh-Prime-News (यूट्यूब व इंस्टाग्राम चॅनेल)
या प्रकरणी पोलीस निरीक्षक सचिन गणपतराव म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा..
ठाण्यातील भव्य डेटा सेंटरला आदित्य ठाकरेंचा विरोध:म्हणाले- तंत्रज्ञानाला विरोध नाही, पण शहराच्या मध्यभागी प्रकल्प का?
ठाण्यामध्ये उभारण्यात येत असलेल्या 22 मजली भव्य डेटा सेंटरमुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्य, पर्यावरण आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकल्पाला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत त्यांनी थेट सवाल केला की, डेटा सेंटर या तंत्रज्ञानाला आमचा विरोध नाही, मात्र ते शहराच्या मध्यभागी आणि रहिवासी भागात का उभारले जात आहे? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला आहे. सविस्तर वाचा..
अर्धवट नाही! वाचा पूर्ण! वाचा पूर्ण बातमी दिव्य मराठी अॅपवर
(0)Comments