काँग्रेसचा २०२९ लोकसभा निवडणुकीसाठी मास्टर प्लॅन
राहुल गांधींचा काँग्रेसमध्ये तरुण नेतृत्वाला संधी देण्याचा प्लॅन
काँग्रेसमध्ये १२० सचिवांची थेट मुलाखतीतून निवड
राहुल गांधींनी सचिवपदाच्या उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या
काँग्रेसमधील घराणेशाहीला राहुल गांधींचा ब्रेक
जेन-झी आंदोलनानंतर काँग्रेस आगामी निवडणुकांसाठी जोमानं कामाला लागलीये. त्यातच राहुल गांधींनी पक्षात तरुण नेतृत्वाला संधी देत थेट भाजपला शह देण्यासाठी हालचाली सुरू केल्यात. काँग्रेसवरील घराणेशाहीचा ठपका पुसण्यासाठी राहुल गांधींनी मास्टर प्लॅनही आखलाय. पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...
२०२९ च्यालोकसभानिवडणुकांसाठी काँग्रेस जोमानं कामाला लागली आहेत. त्यासाठी राहुल गांधींनी नवा मास्टर प्लॅन आखलाय. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय संघटनेत बदलासाठी राहुल गांधींनी नवा प्रयोग राबवण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीत नवीन सचिवांची निवड करण्यासाठी मुलाखतीचा मार्ग निवडलाय. दिल्लीतील बैठकीत संभाव्य 30-40 उमेदवारांचे गट तयार करून उमेदवारांचे थेट मुलाखती घेण्यात आल्यात. काँग्रेसच्या इतिहासात पहिल्यांदाच वरिष्ठ पदांच्या निवडीसाठी राहुल गांधी आणि सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी थेट उमेदवारांच्या मुलाखत प्रक्रियेला सुरुवात केलीये. राहुल गांधीच्या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी कोणते निकष लागू झालेत ते पाहूयात...
दिल्लीतील बैठकीत राहुल गांधींनी सचिवपदासाठी थेट मुलाखती घेतल्या. दिल्ली, यूपी, राजस्थानमधील शिफारसींचा जुना फॉर्म्युला बदलत धडाडीच्या नेतृत्वाला प्राधान्य दिलं. जुन्या नेतृत्वाऐवजी रस्त्यावर उतरणाऱ्या आक्रमक तरुणांची निवड करण्यात आली. भारत जोडो यात्रेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या SC, ST, OBC आणि खुल्या प्रवर्गातील तरुणांना संधी देण्यात आली. घराणेशाहीऐवजी स्थानिक पातळीवरील पकड आणि पक्षासाठी केलेल्या कामाला महत्त्व दिले.
काँग्रेसनं काही दिवसांपूर्वीच आगामी निवडणुका होऊ घातलेल्या 6 राज्यांचे प्रभारी बदललेत. तर राहुल गांधींनी आधीच छात्रों की गूंज कार्यक्रमातून विद्यार्थ्यांकडे आपला मोर्चा वळवलाय. आता संघटना बळकट करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतही मोठे बदल काँग्रेससाठी नवसंजीवनी ठरणार का? यासाठी २०२९च्या निवडणुकांची वाट पाहावी लागणार आहे.
आता थेट मुलाखतीच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये तब्बल 120 सचिव नियुक्त केले जाणारेत. मात्र, राहुल गांधी यांच्या मास्टर स्ट्रोकमुळे काँग्रेसमधील ड्रॉईंग रूम पॉलिटिक्स करणाऱ्या नेत्यांच्या घराणेशाहीतून पक्षाची सुटका होण्याची चर्चा आहे. भाजप काँग्रेसवर नेहमी घराणेशाहीचा आरोप करते. या आरोपांना छेद देण्यासाठी राहुल गांधींनी ही रणनीती आखलीय.
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठीक्लिक करा.
ReadMarathi newsand watch Live TV.Breaking newsfromMaharashtra, India, Pune,Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. GetLive Marathi newson Mobile. Download the Saam Tv app forAndroidandIOS.
(0)Comments