राधाकृष्ण विखे पाटील यांचा अंतरवाली सराटीत जाण्यास नकार
जरांगेंच्या भेटीसाठी मराठा उपसमिती अंतरवालीत जाणार नाही
मराठा आरक्षणावर जरांगे आणि सरकारमध्ये संघर्ष
आता बातमी आहे, जरांगे आणि सरकारमधील संघर्षाची. मराठा उपसमितीच्या शिष्टमंडळानं जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवालीत जाण्यास स्पष्ट नकार दिलाय. त्यामुळे आता जरांगे आणि सरकार आमनेसामने आलंय. सरकारनं आक्रमक पवित्रा घेतल्यानं जरांगे थेट मुंबईत धडकणार का? जरांगेंची आता रणनीती काय? पाहूयात यावरचा विशेष रिपोर्ट...
ऐकलंत, जरांगेंच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर मराठा उपसमितीचे अध्यक्षराधाकृष्ण विखेपाटलांनी केलेल्या विधानावरून आता संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. कारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अंतरवाली सराटीत जाणार नसल्याचं सांगून चर्चेची दार बंद केल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सरकार आणि मराठा आंदोलक आमनेसामने येण्याची शक्यता बळावलीय. कारण विखेंच्या या विधानामुळे जरांगे चांगलेच संतापले असून विखेंनी मराठ्यांचं वाट्टोळं केल्याचा आरोप तर केलाच पण विखेंना सज्जड दमही दिलाय.
दुसरीकडेजरांगे पाटलांचेसर्व मुद्दे सरकारनं सोडवलेत तरी त्यांना काही सवाल असतील तर त्यांनी विचारावं असं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय. त्यावरूनच आता जरांगेंनी मुख्यमंत्र्याना प्रतिसवाल केलाय. मुळात जरांगेंनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर शिष्टमंडळानं पहिल्यापासूनच सावध पवित्रा घेतला. त्यामुळे अधिकारी आणि लाड यांनीच सुरूवातीला जरांगेंशी चर्चा केली. मात्र जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम राहिले.
सरकारनं जरांगेंच्या 15 पैकी 12 मागण्या मान्य केल्या. मात्र इतर तीन मागण्या न्यायलयीन कक्षेअंतर्गत येत असल्यानं त्यावर निर्णय होऊ शकला नाही. आता सरकारनं चर्चेची दारं बंद केल्यामुळे जरांगे थेट मुंबईच्या दिशेने कूच करणार की सरकारविरोधात आणखी दुसरा कोणता डाव टाकणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठीक्लिक करा.
ReadMarathi newsand watch Live TV.Breaking newsfromMaharashtra, India, Pune,Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. GetLive Marathi newson Mobile. Download the Saam Tv app forAndroidandIOS.
(0)Comments