कठीण काळातही जगात भारतावरील विश्वास अधिक वाढला, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६ (Global Fintech Fest 2026) मध्ये केले. संपूर्ण जग संघर्षमय आणि अनिश्चिततेच्या काळातून जात आहे. जगभरात इंधनावरून तणाव वाढलेला आहे. त्यातही भारत ७.८ टक्क्यांच्या विकासदराने प्रगती करत आहे. हा विश्वास तुमच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतो, असंही मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनीयूपीआयबाबतही भाष्य केले. फिनटेकची चर्चा झाली तरी, ती यूपीआय (UPI) शिवाय अपूर्ण असेल. यूपीआयने २५ ऑगस्टला १० वर्षे पूर्ण केली आहेत. तुमची बँक तुमच्या फिंगर पॉइंटवर असेल असे मी म्हणायचो. त्यावेळी काही लोकांना ती अशक्यप्राय गोष्ट वाटायची. पण आता यूपीआय (UPI) भारतातच मर्यादित राहिले नाही. तर भारताचा यूपीआय जगातील ११ देशांतही आहे, अशी माहिती मोदींनी यावेळी दिली.
VIDEO | Mumbai: Prime Minister Narendra Modi says, "I will reiterate that India's reform express will move forward at an even faster pace. Friends, India's fintech story has been remarkable, and one of its biggest champions is our UPI. I spoke about it last year as well. But this…pic.twitter.com/JQ3m0drIWk
मला पॉलिसी आणि गव्हर्नंसशी जोडला जाऊन २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. पण मोदी एका टप्प्यावर पोहोचून आनंद साजरे करणाऱ्यातील नाहीत. आज आणखी एक हॅट्ट्रिक पूर्ण झाली आहे, याचा मला अत्यंत आनंद आहे. एक हॅट्ट्रिक ही २०२४ मध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन करून झाली होती आणि ही हॅट्ट्रिक तुमच्या सर्वांमध्ये येण्याशी संबंधित आहे. ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये येण्याचे हे माझे सलग तिसरे वर्ष आहे, असे मोदी म्हणाले.
विकासित भारतासाठी तुम्ही किती महत्वाचे आहात, हे या हॅट्ट्रिकच्या माध्यमातून दिसून येते. तुमचं काम किती महत्वाचं आहे, दरवेळी मी येथे येतो तेव्हा माझ्याआधीच येथे सर्वाधिक युवक आलेले दिसतात. आधीपेक्षा जास्त ऊर्जा अनुभवायला मिळते. मला स्पष्टपणे दिसतेय की जोखीम घेण्याची क्षमता वाढत आहे. स्वप्ने अधिक ठळक दिसून येत आहेत. त्यामुळेच विकसित भारताच्या भविष्याबाबत माझा विश्वास अधिक दृढ होत आहे, असेही मोदी म्हणाले.
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठीक्लिक करा.
ReadMarathi newsand watch Live TV.Breaking newsfromMaharashtra, India, Pune,Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. GetLive Marathi newson Mobile. Download the Saam Tv app forAndroidandIOS.
(0)Comments