FDA News: मुंबईमध्ये एफडीएची धडक कारवाई, रेल्वे प्रवाशांना अन्नपुरवठा करणाऱ्या कंपनीचा परवाना निलंबित

FDA News: मुंबईमध्ये एफडीएची धडक कारवाई, रेल्वे प्रवाशांना अन्नपुरवठा करणाऱ्या कंपनीचा परवाना निलंबित
View on original source
Category: Health
Share
Archive
Like
September 8, 2026 07:31 PM मुंबई: अन्न आणि औषध प्रशासनाकडून IRCTC अंतर्गत रेल्वे प्रवाशांना अन्न पुरवठा करणाऱ्या बेस किचन आणि फूड प्लाझाची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणी दरम्यान एफडीएकडून आर. के. असोसिएट्स हॉटेलियर्स प्रा. लि. चा अन्न परवाना निलंबित केला आहे. तर, इतरत्र चार अस्थापनांना सुधारणा नोटिस दिली आहे. एफडीएने मुंबईतील कुर्ला, चेंबुर आणि पवईसह ठाणे अशा पाच ठिकाणी एकत्र कारवाई केली आहे. सध्या सणासुदीच्या काळात अन्न आणि औषध प्रशासनाकडून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कारवाईचा धडाका सध्या सुरू आहे. (Food and Drug Administration) एफडीएने कुर्ला पश्चिमेतील आर. के. असोसिएट्स हॉटेलियर्स प्रा. लि. कंपनीचा परवाना निलंबित केला आहे. तर, चेंबूरमधील ओम साई राम एंटरप्राईजेस, अंबुजा हॉटेल्स अँड रिअल इस्टेट प्रा. लि.,एक्स्प्रेस फुड सर्व्हिसेस आणि ठाणे पूर्वेतील अराहा हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. अशा चार कंपन्यांना सुधारणा नोटिस दिली आहे. अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता, अन्न सुरक्षा मानके तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ व त्याअंतर्गत लागू नियम व विनिमयांचे पालन होत आहे किंवा नाही, याबाबत संबंधित आस्थापनांची तपासणी करण्यात आली. (Mumbai News) तपासणीमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने गंभीर त्रुटी आढळून आल्या. त्यामध्ये अन्न साठवण आणि प्रक्रिया परिसरात झुरळांचा वावर, अन्नपदार्थ उघडे ठेवणे, उघड्या कचऱ्याजवळ अन्न तयार करणे, स्वयांपाकघरातील १७ फरशीच्या फरशा तुटलेल्या आढळल्या, तसेच भिंतींना ४ ठिकाणी तडे आणि खराब पृष्ठभाग आढळणे अशा गोष्टी आढळल्या. त्यामुळे एफडीएकडून धडक कारवाई करण्यात आली. शिवाय, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून आवश्यक वैयक्तिक स्वच्छतेचे पालन होत नसल्याचे आढळून आले होते. (IRCTC) यामध्ये, एफडीएच्या कर्मचाऱ्यांना जेवण बनवणाऱ्या कर्मचाऱ्याच्या हाताच्या बोटाला जखम असताना तो अन्न हाताळताना आढळून आला. अन्न हाताळणाऱ्या ३४ कर्मचाऱ्यांपैकी केवळ २१ कर्मचाऱ्यांचीच वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्रे तपासणीवेळी उपलब्ध होती. अन्नपदार्थ तयार करण्याच्या परिसरात ">LPG सिलिंडरच्या लगत अन्न प्रक्रिया केले जाणारे भांडी व अन्न संपर्कातील उपकरणे अस्वच्छ व काही ठिकाणी गंजलेल्या स्थितीत असल्याचे, तसेच अन्न वाहतूक करणारे वाहन अस्वच्छ व गंजलेल्या स्थितीत असल्याचे आढळले. अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगसाठी आवश्यक प्रमाणपत्रे तसेच प्रशिक्षण, देखभाल, कॅलिब्रेशन, स्वयंपाकाचे तापमान व कूलिंग प्रक्रियेबाबतचे आवश्यक अभिलेख अपूर्ण/अनुपलब्ध आढळले.

(0)Comments

 

A note on cookies

Newshunt uses essential cookies to keep you signed in and to remember your language and country, so the site works the way you expect. With your permission, we'd also like to use analytics cookies to understand how people use Newshunt and improve it over time.

Accepting only affects analytics. To learn more, view our Privacy Policy or Terms & Conditions.